शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्रात २५ हजार सोलापूरी चादर व १ ट्रक धान्याची मदत

 

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले असुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्र,दसरा चौक येथील सी.के.पी. बोर्डिंग येथे सुरु करण्यात आले आहे.या केंद्रातुन शहरातील पुरग्रस्त भागात मदत पोहोच केली जाणार आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तु,अन्नधान्य,कपडे,चादर आदि स्वरुपात हि मदत केली जाणार आहे.
आज सोलापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने या मदत केंद्रात भरघोस मदत जमा करण्यात आली.शिवसेनेचे जलसंधारण मंत्री मा.तानाजी सावंत साहेब,सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत,पृथ्वीराज सावंत,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्लक्ष्मीकांत ढोंगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने २५ हजार चादर व १ ट्रक धान्य इतकी मदत करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर शहरवासियांच्यावतीने आभार मांडताना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरेसाहेब व शिवसेना नेते व युवासेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा शिवसेनेकडून मिळालेली मदत बहुमोल असुन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्रातुन सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.शिवसेना पुरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पुरग्रस्त भागात ३ दिवस मेडिकल कॅम्प सुरु असुन पुरग्रस्त भागातील रुग्णांची जबाबदारी वैद्यकीय जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनने घेतली आहे.सोलापूर जिल्ह्याप्रमाणे ईतर जिल्ह्यातुनही मदत मिळणार असुन शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक पुरग्रस्त नागरिकांना हि मदत आम्ही पोहोच करणार आहोत असे सांगितले
यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे नितीन शेळके,छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, बालाजी मार्गम,व्यंकटेश नंद्याळ,संदिप केंदळे,सिद्धेश्वर भोसले,राहुल व्यवहारे,ओंकार बसवंती, कोल्हापूर शहर शिवसेनेचे दिपक गौड,राजु पाटील,सुजित देशपांडे, विक्रम पवार,निवास राऊत,ओंकार परमणे,रविंद्र सोहनी,रणजित सासने,मुकुंद मोकाशी,अमोल बुढ्ढे,अरूण पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!