
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याने त्यांनी आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचला तर खरा पण तेथेही पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे .शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता या मुद्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) चीनच्या विनंतीनंतर अनौपचारिक बैठक करण्याचे ठरले होते. परंतु, ही चर्चा एक बंद खोलीत गुप्त पद्धतीनं झाली. परंतु पाकिस्तानचा यालाही आक्षेप घेत हा मुद्दा संयुक्त राष्ट्रानी खुल्या मंचावरून घ्यावा अशी विनंती केली , परंतु, संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानची ही मागणी साफ फेटाळून लावलीय.यामुळे पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Leave a Reply