कुस्तीपटू बजीरंग पुनिया ला खेळरत्नसाठी नामांकन

 

दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी  दिला जाणारा हा  सर्वोच्च सन्मान मानला जातो,  गेल्या वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकलेले नव्हते. मात्र या वर्षभरात त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला यंदा सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. १२ सदस्यीय निवड समितीने त्याच्या नावाला पसंती दर्शवली आहे.या समितीत बायचूंग भुतिया, मेरी कोम यांसारखी क्रीडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध क्रीडापटू यांची नावे आहेत. या समितीतीत  सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!