एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ संपन्न

 
कोल्हापूर: कोल्हापुरातील सतत सामाजिक उपक्रमात असणारी एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा २०१९-२०२० या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.क्लबच्या मावळत्या अध्यक्षा प्रिती चंदवाणी यांनी नूतन अध्यक्षा वसुधा लिंग्रस यांना आपला पदभार सुपूर्त केला.तसेच २०१८-१९ च्या सचिव हिमाली शहा यांनी नूतन सचिव डॉ.मयुरा खोत यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या एनरव्हील क्लबच्या जिल्हाच्या माजी चेअरमन सायली प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली आणि यावर्षीच्या चेअरमन नंदा झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली हा पदग्रहण समारंभ पार पडला.मावळत्या अध्यक्षा प्रिती चांदवाणी यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजने आजवर समाजातील अनेक गरजू,गरीब आणि वंचित घटकांना मदत केली आहे.यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे,ग्रामीण भागात साक्षरता अभियान,अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न,इ-लर्निग याचबरोबर गरजूंना गेल्या वर्षात मदतीचा हात दिला आहे.राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या या संस्थेने गेल्या पाच वर्षात अंतरराष्ट्रीय पातळी गाठली आहे.’एकत्र करू शकतो’ ह्या यावर्षीच्या घोषवाक्याप्रमाणे  संस्थेचा प्रगतीचा व जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम  राबविण्याचा आलेख चढताच ठेवणार यामध्ये महिला सक्षमीकरण, महिला स्वसंरक्षण,आरोग्य कार्यक्रम सारखे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही नूतन अध्यक्षा वसुधा लिंग्रस आणि सचिव डॉ. मयुरा खोत यांनी दिली.यावेळी प्रतिमा पाटील सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी क्लबच्या वतीने जरग नगर येथील शाळेला सॅनिटरी वेंडीग मशीन प्रदान केले.यावर्षी पदाधिकारी म्हणून उपाध्यक्षा रितू वायचळ ,आयएसओ स्मिता सावंत, खजानीस अश्विनी सुवर्णा,सहसचिव डॉ. कावेरी चौगुले, एडिटर अमृता पारेख,वैशाली राजे, स्मिता खामकर, प्रशांती जाधव,प्रेरणा मेहता,दिव्या घाटगे,प्रिया मेंच,गीतांजली ठोमके,सुरेखा माने,वैशाली पाटील,वृषाली बाड, गौरी कारीकर, माजी अध्यक्षा ममता गद्रे आणि माजी अध्यक्षा शर्मिला खोत यांनी संचालक पद स्विकारले.वैशाली राजे आणि स्मिता खामकर यांनी सूत्रसंचालन केले.नूतन सचिव डॉ. मयुरा खोत यांनी आभार मानले.या वेळी एनरव्हील क्लब जिल्हाच्या माजी अध्यक्षा डॉ.विद्युत शहा यांच्यासह क्लबच्या पदाधिकारी, सदस्या,रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!