
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर यावर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. या जलप्रलयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाकडून या पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर केली आहे. परंतु, जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना सध्या देण्यात येणारी नुकसानभरपाई ही तुटपुंजी असल्याने यामध्ये भरीव वाढ करण्याची आवश्यकता आहे. या पूरपरिस्थितीबाबत मंत्रालयीन स्तरावर आज महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पुरस्थितीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये भरीव वाढ करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रमुख 24 मागण्या केल्या आहेत.या मागण्यांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये भरीव वाढ करणेच्या दृष्टीने तातडीने उचित कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच यामध्ये अजून काही नुकसान झालेले काही घटक असतील तर त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
Leave a Reply