
कोल्हापूर : सहकार क्षेत्रात गेली १०३ वर्षे आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवणारी अग्रगण्य आणि ५६५ कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठणारी कोल्हापूर को-ऑप अर्बन बँक आपला शतकपूर्ती सांगता सोहळा करत आहे.या निमित्ताने सभासदांना भेट वस्तू प्रदान तसेच बँकेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सोमवार दि.१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे.सहकार आणि सार्वजनिक मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे अध्यक्षस्थानी तर छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ.अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नामदेवराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासगी सावकाराकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेची स्थापना केली.त्यांच्याच विचारांचे तंतोतंत पालन करत १०३ वर्षाच्या कालावधीत बँकेने प्रचंड प्रगती केली आहे. ग्राहकांना बँकिंग सुविधा,नवतरुणांना उद्यमशील बनविणे, शिक्षितांना उच्च शिक्षित बनविणे, स्वतःचे घर विवाह, लघु उद्योग वाढविणे,दुचाकी,चारचाकी खरेदी,वाहन खरेदी,यंत्र सामुग्री खरेदी,कृषी,साखर कारखानदार अशा सर्व घटकांना कर्ज तसेच अर्थ सहाय्य यामुळेच बँकेकडे कर्जे आणि ठेवी यांचा ओघ वाढला आहे.या सर्व प्रवासात सभासद तसेच ग्राहकांचा विश्वास व सहकार्य हाच बँकेचा अमूल्य ठेवा आहे असेही कांबळे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष पी.टी.पाटील,संचालक शिरीष कणेरकर,शिवाजीराव कदम,यशवंत साळोखे,जयसिंगराव माने,राजन भोसले,मधुसूदन सावंत,केदार कुंभोजकर,मोहन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुबराव पवार, जनरल मनेजर सुरेश चौगुले,बाजीराव खरोशे,भाऊसो कांबळे यांच्यासह संचालक,पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply