
कोल्हापूर : ” ताकद महाराष्ट्राची ; प्रत्येक माणसाची “…! हे घोषवाक्य घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल गेली वीस वर्षे सुरू होती पण याच पक्षातील आता एक एक माणूस भारतीय जनता पक्षात जाऊ लागला आहे यामुळे ऐनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाची महाराष्ट्रा मधील ताकद कमी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला गाशा गुंडाळावा लागतो काय अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे पण त्या अगोदरच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताराबाई पार्कातील जिल्हा कार्यालयानं आपला गाश्या गुंडाळला. खाडे बिल्डिंगमध्ये गेली वीस वर्ष एकही रुपया भाडे न देता – घेता हे कार्यालय सुरू होतं पण गेल्या दोन दिवसात या कार्यालयाचा गाशा अचानकपणे गुंडाळण्यात आला. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच्या मध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.संगीता उदय खाडे या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तालुकापातळी पासून देशपातळीपर्यंत गेली पन्नास वर्ष ते आजतागायत राजकारण समाजकारण सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि वयाची ८० वर्ष पूर्ण केलेल्या खासदार शरद पवार यांनी सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली अल्पावधीतच या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर एक आगळेवेगळे स्थान निर्माण करून दिलं तसेच सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा हृदयाच्या टिकटिक प्रमाण घड्याळाची टिकटिक सुरू ठेवले पण लोकसभा निवडणूकी पासून राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आणि खासदार शरद पवार यांची राजकीय वेळ बदलली लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अनेक विश्वासू सहकारयांनी भारतीय जनता पक्षाच कमळ हातात घेतलं या पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यातील प्रमुख नेतेमंडळीनी शिवसेना-भाजप महायुतीबरोबर नवा घरोबा स्थापन करण्यास प्रारंभ केला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याची आणि अस्तित्वाची चर्चा सुरू झाली कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल आमदार हसन मुश्रीफ के पी पाटील ए वाय पाटील आर के पवार संगीता खाडे यांच्यासह अन्य नेत्यांसमवेत दमदारपणे सुरू राहिली पक्षाला सौ संगीता खाडे यांच्या मालकीच्या खाडे बिल्डींग मधील पार्किंगची प्रशस्त जागा वीस वर्ष वापरायला मिळाली एकही रुपया भाडं न देता – घेता हे कार्यालय ताराबाई पार्कातील खाडे बिल्डींग मध्ये आज पर्यंत सुरू होतं याच्या बदल्यात सौ संगीता खाडे यांना देवस्थान व्यवस्थापन समितीचं सदस्यपद , महिला जिल्हाध्यक्षा , प्रदेश कार्यकारणी सदस्य , ही मानाची पदं मिळाली. पण अचानक ताराबाई पार्कातील या कार्यालयाचे साहित्य गेल्या दोन दिवसात इतरत्र हलविण्यात आल आहे नव कार्यालय कुठे आणि कधी सुरू होणार हे अद्याप कोणालाच माहीत नाही पण ताराबाई पार्कातील कार्यालय अचानकपणे बंद करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच कार्यालय आर के पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी स्टेडियममध्ये सुरू आहे तर जिल्हा कार्यालय खाडे बिल्डिंगमध्ये सुरू होतं पण या दोन्ही कार्यालयांचे राजकीय सुर कधीच जुळले नाहीत दोन्ही कार्यालयाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मधील उघड-उघड गटबाजी नेहमीच दिसून आली आता खाडे बिल्डींग मधील जिल्हा कार्यालय अचानकपणे बंद करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता खाडे या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचा चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झाली आहे हे कारण तर जिल्हा कार्यालय बंद करण्यामागे नसेल ना ..? असा तर्क कार्यकर्ते लढवत आहेत संगीता खाडे यांच्या देवस्थान समिती सदस्य पदाची मुदत संपली आहे .प्रकृती कारण दाखवून त्या पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा येत्या आठ पंधरा दिवसात देणार आहेत आणि या पाठोपाठ त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यामुळे ताराबाई पार्कातील त्यांच्या खाडे बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पक्ष कार्यालयाचा फलक लवकरच लागल्याचं दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना या पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष हे राज्य पातळीवरील मानाचं पद दिलं त्यांच्या पाठोपाठ संगीता खाडे सुद्धा भारतीय जनता पक्षात जात आहेत त्यांची सुद्धा एका अशासकीय समितीवर सदस्य म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनाही मानाचं पद मिळेल सध्या तरी त्या कोणत्याही अटी शर्ती शिवाय भाजपमध्ये जात असल्या तरी देवस्थान समितीचे सदस्य पद त्यांना पुन्हा मिळेल किंवा अन्य एकाद प्रशासकीय पद मिळेल असं वाटतं त्यांचे जिल्हाध्यक्ष पद रिकाम होताच या पदाच्या नव्या शर्यतीमध्ये जहिदा मुजावर स्नेहल मठपती शितल तिवडे यांच्यासह अन्य ज्येष्ठ महिला पदाधिकारी उतरण्याची शक्यता आहे.
Leave a Reply