तमाम जनतेच्या साथीने पुन्हा सत्ताधारी होऊन कोल्हापूरात येऊ:मुख्यमंत्री

 

कोल्हापूर: ऐतिहासिक ताराराणी चौकात दोन तास वाट बघत असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना अभिवादन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोल्हापूरहून मुंबईत जाऊन पुन्हा सत्ता घेऊन आपले व महालक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी कोल्हापुरी पुन्हा येऊच “असे टाळ्यांच्या गजरात ऊत्साही वातावरणात सांगितले. रात्री साडेनऊ वाजता त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून देवेंद्र फडणवीस यांचा उत्साह कायम होता.वाहनातील व्यासपीठावरुनच त्यांनी संवाद साधताना,त्यांच्यासमवेत असलेल्या करवीर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, कागलचे म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नूतन प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,महेश जाधव त्यांच्यावर आपले आशीर्वाद असावेत आणि आगामी निवडणुकीत ते मतातून व्यक्त व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या अवघ्या सात मिनिटांच्या भाषणात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाच वर्षे पूर्ण कालखंड केलेले सरकार जनतेसाठी केलेल्या विविध कामाचा लेखाजोखा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. आणि जनतेला आपला आशीर्वाद व कौल मागत आहे. आणि मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुन्हा नंतर एकदा आपणच सत्ताधारी होऊ,असा विश्वास ही व्यक्त केला.भाषणानतंर त्यांनी स्वतः झेंडा फडकावत तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी आपण पुन्हा सज्ज आहोत,असा संदेश ही दिला.त्यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार सुरेश हाळवणकर,जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक,महानगरपालिका नगरसेवक किरण नकाते, माजी स्थायी सभापती अशिष ढवळे त्यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मान्यवर,आघाडीप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळी वातावरण असूनही आणि रात्री उशीर होऊनही कोल्हापुरात झालेल्या स्वागताने मुख्यमंत्री फडणवीस हे भारावून गेले. आपल्या छोटेखानी भाषणात स्वतः भाजपचा झेंडा घेऊन हवेत फडकावत सर्वांचा उत्साह आणखीच वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!