
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या लोखंडी ग्रीलला अज्ञात वाहनाने ठोकर दिली.यामुळे सदर ग्रीलचे नुकसान झाले.याबाबत आज दुपारी एकच्या सुमारास समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल यांनी लक्ष्मीपुरी चे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना दूरध्वनीवर संपर्क करून चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या अज्ञात वाहनावर गुन्हा नोंद करावा. तसेच त्या चौकात जे अतिक्रमण आणि वाहने थांबतात त्यावर कारवाई करावी याची फिर्याद दिली. त्यानंतर तातडीने त्या स्थळी लक्ष्मीपुरी चे पोलीस कर्मचारी दाखल झाले त्यांनी सविस्तर घटना पाहून पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली.त्यानुसार सायंकाळी सहा वाजता लक्ष्मीपुरी येथे बैठक घेण्याचे ठरले .त्यामध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक , शहर अभियंता , सुशोभीकरण ठेकेदार आदींना बोलवण्याची मागणी महेश उरसाल यांनी केली .त्यानुसार आज सायंकाळी ही बैठक घेण्याचे ठरले.यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते बंडा साळुंखे , राजेंद्र सूर्यवंशी अवजड वाहतूक सेनेचे हर्षल पाटील ,हिंदू एकता शहरप्रमुख संजय साडविलकर , सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक , संदीप संकपाळ , युवा सेनेचे ऋतुराज क्षीरसागर, शहाजी तरुण मंडळाचे उदय शिंदे , पतित पावन चे सुनील पाटील आदींसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply