
कोल्हापूर :आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवड झालेल्या कोल्हापूर जिल्हयातील 10 हजार लाभार्थी कार्ड – गोल्डन कार्ड वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत तयार करण्यात आली असून ती संबंधित लाभार्थ्यांना वितरीत केली जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सीपीआर रुग्णालयातील आपत्तकालीन वैद्यकीय कक्षास भेट देवून रुग्णांना फळे वाटप केली. तसेच रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहूल चिकोडे, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अजित लोकरे, उप अधीष्ठाता डॉ. बी.वाय. माळी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. एम.व्ही.बनसोडे, डॉ. व्ही. ए. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply