
कोल्हापूर : यंदाच्या वर्षी अत्यंत प्रेरणादायी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक सुपर 30 या चित्रपटाचा प्रिमियर पहिल्यांदाच स्टारगोल्ड व स्टार प्लस वर 22 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 1 वाजता पाहायला मिळणार आहे.दूरदृष्टी शिक्षण तज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावरील ही सत्यकथा असून हृतिक रोशन ने त्यांची भूमिका अत्यंत समर्थपणे साकाराली आहे. वंचित वर्गातील अत्यंत महत्वाकांक्षी अशा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अवास्तव स्वप्ने साकार करून त्यांना स्पर्धात्मक अशा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे अशक्यप्राय लक्ष्य साकार करण्याचे कार्यकसे साध्य होते हे या चित्रपटात दाखवले आहे.प्रमोशन अॅक्टिव्हिटीजचा एक भाग म्हणून भारतातील क्रमांक 1 च्या ब्लॉकबस्टर बॉलिवूड फिल्म चॅनल असलेल्या स्टार गोल्ड ने सुपर 30 एक्सप्रेस नामक रोमांचक मोहिम सुरू केली आहे.ज्यामध्ये एक वाहन भारताच्या विविध शहर व गावांमध्ये फिरणार असून ज्याद्वारे विद्यार्थ्यांना बुध्दिला आव्हान देणाऱ्या गणित व विज्ञानातील प्रश्नांची उकल करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. या प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नसते. सुपर 30 या चित्रपटाच्या माध्यमातून अधिकधिक विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान या विषयांची निवड करून हे विषय स्वीकार करणे हा या मोहिमेचा उद्देश्य आहे.या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना स्टार इंडियाचे प्रवक्ता म्हणाले की,आमची मोहिम एका सोप्या संकल्पनेवर आधारित आहे. सुपर 30 एक्सप्रेसमुळे भारताच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि आकडेवारीतील गंमत आणि विज्ञानातील रोमांच याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करणे हाच या मोहिमेचा खरा उद्देश आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या ब्रॅण्डने गणित व विज्ञानाशी संबंधित सोपे प्रश्न तयार केले असून या मूलभूत ज्ञान असलेल्या कोणालाही हे प्रश्न सोडाविता येतील.100,000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे स्टार टीम प्रयत्नशील आहे.
Leave a Reply