
मास्को :”सामाजिक आणि राजकीय भौगोलिक परिस्थिती आणि काळाच्या संदर्भात गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यात तुलना करणे कठीण आहे परंतु मानवी जीवनात व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरचे दुःख दूर करण्यासाठीचे दोघांचे प्रयत्न आणि त्यामागचे तत्वज्ञान यात मोठे साम्य आहे बुद्धाने दुःख दूर करण्यासाठी चार आर्यसत्ये व अष्टांग मार्ग सांगितला तर कार्ल मार्क्सने दारिद्र्याचे तत्वज्ञान सांगितले .भांडवलदार कामगारवर्गाचे शोषण करतात त्यामुळे कामगार वर्गाची दुःख वाढते बुद्ध आणि मार्क्स दोघांनीही स्वतः दुःख भोगले व त्यावर उपाय शोधला यासंदर्भात भारत व रशिया या दोन देशांच्या संस्कृती आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात मैत्री वाढू शकते असे विचार डॉक्टर सुभाष देसाई यांनी दोन दिवस चाललेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अलेक्झांडर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात मांडले या कार्यक्रमाला अनेक निवृत्त आयएएस अधिकारी ,अनेक प्राचार्य ,अनेक प्राध्यापक आणि भारतभर आणि रशियातील प्रतिनिधी उपस्थित होते .त्यांनी जोरदार टाळ्यांनी या भाषणाचे स्वागत केले . फिलोसोफर च्या दृष्टीतून आम्ही असे संशोधन प्रथमच ऐकले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली .अलेक्झांडर पुष्किन आणि रशियन भाषा संस्था व मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे शोध निबंधांचे 225 पानांचा एक संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला त्यात डॉक्टर सुभाष देसाई यांचा शोध निबंध संपूर्ण प्रकाशित केला आहे डॉक्टर सुभाष देसाईंचे डॉक्टर रत्नाकर गायकवाड .डॉक्टर सोनू सैनिक आणि एशिया मुंबई विद्यापीठाचे प्रोफेसर व संचालक डॉक्टर संजय देशपांडे .डॉक्टर शिवाजी सलगर डॉक्टर बळीराम गायकवाड डॉक्टर किरण सावे आणि डॉक्टर तानाजी पोळ डॉक्टर भगवान जयस्वाल, प्रोफेसर विवेक पुराणिक, अशोक ठाकूर ,डॉक्टर योगेश बोरसे कश्यप पाठक, लोकांनी अभिनंदन केले
Leave a Reply