
कोल्हापूर:महाद्वार कमान ते ताराबाई रोड 100 फूट परिसर चौक फेरीवाले हटवून इतर फेरीवाल्यांच्या अतिक्रमण कारवाईला दिवाळीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कारवाईला स्थगिती देण्यात आली.ताराबाई रोड वरील फेरीवाल्यांचा अतिक्रमण निर्मूलन केल्यानंतर उद्भवलेल्या इतर परिस्थिती दाखविण्यासाठी आज सकाळी हिंदुत्ववादी संघटनेचे महेश उरसाल यांनी शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत यांच्याशी चर्चा करत ताराबाई रोडवरील फेरीवाले हटविल्या नंतर त्या जागेवर एकामागोमाग रिक्षा आणि चार चाकी वाहनांनी तो रस्ता पुन्हा अडविला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तसेच आचारसंहिता लागल्यामुळे महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या तयारीत लागल्यामुळे अतिक्रमित फेरीवाल्यांना कपिलतिर्थात जागा द्यायची ठरली आहे पण अद्याप तिथला कोंडाळा , टू व्हीलरपार्किंगकॉंक्रीटीकरण ,लाईट व्यवस्था अद्याप पूर्ण नसून त्या लगेच होईल असेही चिन्ह नाहीत.तसेच जागेची मार्किंग करून अधिकृत बायोमेट्रिक धारक फेरीवाले नोंद करून तिथे बसवायला ही वेळ लागेल.ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत आहे पण त्यामुळे गेले 4 दिवस फेरीवाल्यांचे धंदे बंद आहेत. नुकतीच पूरपरिस्थितीमूळे व्यवसायावर परिणाम झाला असून काहीजण पूरग्रस्त ही आहेत. स्थानिक फेरिवल्यांचा धंदा फक्त बंद झाला आहे.मात्र परप्रांतीय बिनधास्त रस्त्यावर धंदा करत बसलेत.त्यामुळे स्थानिकांचा प्रामुख्यानं विचार व्हावा अशी भूमिका मांडली. दिवाळी पर्यंत फेरीवाल्यांना त्यांच्या पूर्वीच्या मूळ जागेवर दुकानाला लागून 5 फुटापर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी आणि तात्पुरत्या स्वरुपात कारवाई थांबवावी.जर फेरीवाल्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिरिक्त अतिक्रमण केले तर कडक कारवाई करावी आम्ही त्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही.तसा शब्द फेरीवाल्यच्यावतीने महेश उरसाल यांनी अधिकाऱ्यांना दिला.त्यावर चर्चा करून शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत यांनी महापालिका आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्याशी संपर्क साधून महेश उरसाल यांनी मांडलेली बाजू सांगितली त्यावर आयुक्त साहेबांनी महेश उरसाल यांना तात्पुरता तोडगा मान्य करतो मात्र पुन्हा तक्रार येईल अशी वर्तवणूक होऊ नये.याची काळजी घ्या अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल असे सांगितले.यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे राजेंद्र सूर्यवंशी ,शिवसेना अवजड वाहतूक संघटनेचे हर्षल पाटील ,निरंजन शिंदे , फेरीवाला संघटनेचे नेते अविनाश उरसाल ,किरण गवळी ,राजेंद्र महाडिक,नजीर देसाई ,राजू नरके ,बजरंग फडतारे,प्र.द.गणपुले ,अशोक माळी आदींसह फेरीवाले उपस्थित होते.
Leave a Reply