
कोल्हापूर: शिवसेनेच्या वतीने आज नव महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला सहभागासाठी “प्रथम ती” अभियानातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांच्या कला गुणांना वाव देवून महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य, स्वावलंबन हा पंचसूत्री कार्यक्रम राबवा, अशा सूचना यावेळी शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिका नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केल्या. शिवसेनेच्या वतीने आयोजित “प्रथम ती” महिला संमेलन आज राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडले. महिला सक्षमीकरण करणे हा उद्देश आहे. महिला सक्षम झाली तर तिचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहील. महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेना नेहमी अग्रेसर आहे. यासाठी महिलांना सरंक्षणाचे धडे शिवसेनेच्या वतीने दिले जात आहेत.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला बळ देण्यात महिलांचा वाटा मौल्यवान असल्याचे सांगितले.स्त्री, पुरुष असा भेदभाव शिवसेनेने कधी केला नाही त्याचमुळे ठाणे महापालिकेत ७० टक्के महिला नगरसेविका या शिवसेनेच्या आहेत.शिवसेनेची महिला आघाडी हा वाघीणींचा ताफा असून, या ताफ्यात इतर वाघिणींना सामावून घेवून समाज उन्नतीचे काम करावे.यानंतर मुंबई माजी नगरसेविका रंजना शिंत्रे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी मनोगते व्यक्त केली. तर सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले.यावेळी शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख भारती शिंगटे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना नगरसेविका सौ. तेजस्विनी इंगवले, सौ.मंगलताई साळोखे, सौ.पूजा भोर, स्मिता माळी आदी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
Leave a Reply