वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये अद्ययावत हृदयरोग विभाग

 

कोल्हापूर :येथील शिवाजी उद्यमनगर मधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये नव्या व्यवस्थापनेखाली अद्ययावत उपचाराचा हृदयरोग विभाग कार्यान्वयीत झाला आहे. मुंबई सह देशातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचाराचा मोठा अनुभव असलेले डॉ युवराज पोवार या विभागाचे प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या “बीइंग डॉक्टर” या संकल्पनेवर आधारीत डॉ.युवराज पोवार हे उपचार करणार आहेत.यामुळे महानगराच्या तुलनेने माफक दरात हृदय रोग उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत.गेली दोन पिढ्या वालावलकर हॉस्पिटलने समाजातील विविध स्तरातील तसेच आर्थिक दुर्बल घटकाला यशस्वी वैद्यकीय उपचार अल्प खर्चात करून आपला विश्वास जपला आहे. हाच विश्वास अधिक व्यापक करण्यासाठी महालक्ष्मी हेल्थ फौंडेशन वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा सुविधा व कुशल मनुष्यबळ यांच्याद्वारे कार्यरत आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आम्ही हॉस्पिटल मध्ये अंतर्गत आल्हाददायक बदल केले आहेत,तसेच सेवाभावी वृत्तीने काम करणारा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.नुकत्याच आलेल्या महापुरात विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेऊन शस्त्रक्रियेची गरज असलेल्या ४४ पूरग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले.लवकरच केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना हॉस्पिटलमध्ये सुरु होणार असल्याची माहिती महालक्ष्मी हेल्थ फौंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी व वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील कुबेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ युवराज पोवार, रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.वैष्णवी देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!