
कोल्हापू: म.न.पा.नेहरुनगर शाळेत भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त स्वच्छता मोहिम घेण्यात आली.यावेळी कोल्हापूर दक्षिण चे आमदार अमल महाडिक उपस्थित होते. त्यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले.विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शिवाय शाळेच्या रंगकामासाठी आमदार यांनी स्वनिधी उपलब्ध करुन दिला व तात्काळ रंगकाम सुरु केले याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक घोरपडे
,भाजप पदाधिकारी संतोष लाड,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर देसाई,उपाध्यक्षा श्रद्धा जोगळेकर, सदस्य डाॕ.विनायक शिंदे,गवस मुल्लाणी,महेश सावंत,सुनिता माने, अश्विनी दळवी,इतर सदस्य,शिक्षक वृंद,विद्यार्थी,सेवक,पालक उपस्थित होते.

Leave a Reply