
कोल्हापूर: आज देशातील व राज्यातील राजकीय सामाजिक स्थिती गेल्या साठ वर्षात खाली गेली नव्हती तितकी आज गेली आहे. नीतिमूल्य संस्कृती व निष्ठा पायदळी तुडवले जात आहे. कृतज्ञतेच्या ऐवजी कृतघ्नता, स्वार्थ याचा बाजार विधानसभा निवडणुकीत मांडला आहे. हे जनता हताशपणे पाहत आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेच्या हिताचे व हक्कांची जपणूक करण्यासाठी गेली 52 वर्षे सातत्याने माजी कृषीमंत्री शरद पवार हे लढत देत आहेत. त्यांच्यावर नि:स्वार्थीपणे प्रेम करणारे व निष्ठा असणारी अनेक मंडळी आज कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या सर्वांना एकत्रित करून आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी काँग्रेसच्यावतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शरद पवार हा आमचा पक्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जागृतता निर्माण करणार आहे असे अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याआधीही युतीची सत्ता होती पण सत्तेचा कधी गैरवापर होत नव्हता. हे सरकार फक्त घोषणा देते काम काहीच करत नाही. आणि यांच्याविरोधात बोलले की ते ईडीचा धाक दाखवतात. भाजपला देशातील विरोध संपूर्णपणे मोडून काढून एकतर्फी हुकूमशाही आणायची आहे.यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये एस. काँग्रेस ग्रुप सहभाग घेणार असून सर्व माध्यमातून व प्रचार पत्रकातून भाजपचा पोलखोल करण्याचा मानस आहे, असे दत्ता गाडवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सुभाष पाटील, बाजीराव शिंदे, गणपतराव बागडी, अरुण निंबाळकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply