
कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 मतदार संघांसाठी शील अशिष, आर. नटेश, एम.डी. शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार या चौघांची खर्च विषयक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.271- चंदगड, 272 -राधानगरी व 273 -कागल या विधानसभा मतदार संघासाठी शील आशिष यांची नेमणूक झाली आहे. 274- कोल्हापूर दक्षिण आणि 275- करवीर या मतदार संघासाठी आर.नटेश यांची नेमणूक झाली आहे. 276- कोल्हापूर उत्तर आणि 277-शाहूवाडी या मतदार संघसाठी एम.डी.शादाब अहमद यांची नेमणूक झाली आहे तर 278- हातकणंगले, 279- इचलकरंजी आणि 280-शिरोळ या मतदार संघासाठी जे.आनंद कुमार यांची नेमणूक झाली आहे. या निवडणूक निरीक्षक पथकासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण हे काम पहात आहेत.
Leave a Reply