
कोल्हापूर: धनगर समाजाचे प्रमुख नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दोन दिवसानंतर पुढील राजकीय दिशा जाहीर केली जाईल असे त्यांनी सांगितले.सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कोणत्या पक्षात जायच याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगून गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे, या प्रश्नातील 80 टक्के अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्या आहेत. त्यामुळे हा
प्रश्न भाजपच सोडवू शकेल अशी धनगर समाजाची धारणा झाली आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपले कसलेही मतभेद नाहीत,पण समाजाच्या प्रश्नासाठी आपण वंचित आघाडीच्या कामा पासून अलिप्त होत आहोत.
Leave a Reply