
कोल्हापूर :कै अनंतराव गोविंदराव कोरगांवकर सामाजिक सेवा संघ (ट्रस्ट) आणि कोरगांवकर पेट्रोल पंप यांच्यावतीने यावर्षीही जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचे योजिले आहे.हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता येथील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.गेली ७ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कै .अनंतरावगोविंदराव कोरगांवकर जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व इंदिरा गांधी नॅशनल अवॉर्डविजेते ज्यांनी संपूर्णआयुष्य समाजसेवेसाठी अर्पित केले .अशा या महान व्यक्तिच्या स्मरणार्थ कोरगांवकर कुटुंबियांनी त्यांच्या नावे ट्रस्टची स्थापना केली.त्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल पंपाच्याव्यवसायातून समाजातील दुर्बलघटकांना नैसर्गिक आपत्तीवेळी मोफतअन्नछत्र ,मोफत वैदयकिय सेवा व अँब्युलन्स तसेच मोफत वृक्षारोपण वाटप,वारकरी संप्रदाय मदत अशाअनेक सेवा ट्रस्ट मार्फत वर्षानुवर्षे राबवले जातात त्यातील एक भाग म्हणून जेष्ठ नागरिकांचा सत्कार जेष्ठ नागरिक असे कि ज्यांनी आपले आयुष्य निस्वार्थ भावनेनेलोकसेवेसाठी बहाल केले अशामहान लोकांचा सत्कार कोरगांवकरट्रस्ट मार्फत आयोजित केला आहे.यावर्षी श्रीमती रजनी शेटे,दादासाहेब पाटील,आदिलशा नदाफ,एस. डी. लाड,मोहन हवालदार,आप्पासाहेब देसाई,महादेव गायकवाड,श्रीकांत आदिवडेकर,राजाराम शिंदे,आनंद म्हाळुंगेकर,देवदत्त रुकडीकर,श्रीमती शशीप्रभा परुळेकर,विजयराव जाधव,श्रीमती रत्नमाला घाळी,श्रीधर घुगरे, सौ.शालाबाई घुगरे,बाबुराव कबाडे, गिरीधारी नारंग,शिवाजी आडूरकर,बंकत चोरगे,सूर्यकांत वायदंडे,सुभाष झगडे,भागवत (हर्षनील सेवा केंद्र).आदींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी कर्नल संजीव सरनाईक,मेजर संजय शिंदे,सौ.रजनीताई मगदूम, सौ स्वाती गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.पत्रकार परिषदेस आशिष कोरगावकार, राज कोरगावकार, आकाश कोरगावकार,अनिकेत कोरगावकार,सुधाकर तोडकर उपस्थित होते.
Leave a Reply