
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर कडून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बाजीराव खाडे यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. काँग्रेस पक्षाचा मी एक जबाबदार पदाधिकारी असून आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पक्षामध्ये जिल्हा तसेच प्रदेश पातळीवर विविध जबाबदाऱ्या मी समर्थपणे पार पाडल्या आहेत.पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी काम केलेले आहे. सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून उत्तर प्रदेश राज्याचा सह प्रभारी म्हणून कार्यरत आहे. आजपर्यंत जे मी काम केले आहे याची माहिती पक्षातील वरिष्ठांना आहे. मला उमेदवारी मिळावी यासाठी मी कोणत्याही नेत्याकडे आग्रह केलेला नाही किंवा नावाची शिफारसही केलेली नाही. परंतु काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेते तसेच जेष्ठ असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही विश्वासात घेऊन मी इच्छुक आहे एवढीच इच्छा व्यक्त केलेली आहे. तरी काँग्रेस पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्या प्रचाराचे प्रामाणिकपणे काम करून सर्वांच्या साथीने त्यांना निवडून आणणार आहे, असे बाजीराव खाडे यांनी सांगितले.
Leave a Reply