
कोल्हापूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ म्हणजे कोल्हापूरची आई अंबाबाई चा इतिहास पाहता आदिशक्ती दुर्गेचा जागर करणारा शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र चालू असताना भारतीय जनता संविधान मंचच्या वतीने यावर्षीही दृककला शिल्प व कोल्हापूर कॉलिंग या कोल्हापूर मधील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने एका भव्य मंडपात जगदंबा नारायणीसाठी सर्वसामान्य भाविकांना सहभाग घेता येण्याकरिता म्हणून नवचंडी होम, श्री अंबाबाई मातेच्या मूर्तीची विधीवत स्थापना, अभिषेक, मूर्तीपूजन, दर्शनभक्ती, नित्यपूजा, धार्मिक कार्यक्रम, यज्ञ कुंकुमार्चन व प्रसाद २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेअकरा व सायंकाळी सहा ते साडे दहा या दरम्यान यल्लमा मंदिर परिसरातील पद्म पूजा सरोवर, तुळजाभवानी मंदिरासमोर होणार आहे याचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन भारतीय जनसंघ संविधान मंचाचे पारस ओसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केले. तसेच त्याठिकाणी कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार अशोक सुतार यांच्या अनेक वर्षाच्या श्रमातून पाषाणामध्ये तयार केलेली मूळ स्वरूपातील शिल्प मूर्ती येथे भाविकांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध आहे, तरी शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, भजनी मंडळी सप्तशक्ती, पठण पूजन करणारे साधक यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन आपली कला सादर करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी अतुल भंडारी सागर पडळकर गणेश चिले अतिश पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply