
कोल्हापूर: आई अंबाबाईचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची पहिली आणि महत्वाची पायरी पूर्ण केली. निवडणूक अर्ज भरला आहे, आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे असे वाटते. गेल्या पाच वर्षांमधील विकासकामांना प्राधान्य देत यावेळीही आपण मला बहुमताने निवडून द्याल याची खात्री आहेच, याचबरोबर तुमच्या प्रत्येक अपेक्षेला मी खरा उतरेन हा विश्वासही मी तुम्हाला देतो. माझ्या मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या सहाय्यासाठी मी नेहमीच तत्पर असेन ही ग्वाही या निमित्ताने मी देतो. तुमचे प्रत्येक मत हे विकासाला, सुरक्षिततेला, प्रगतीला असेल याची मी शाश्वती देतो.असे अमल महाडिक यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक,महेश जाधव आदी उपस्थित होते.
Leave a Reply