
कोल्हापूर : इचलकरंजी गावभाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांनी इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात 16 ठिकाणी आज छापे घातले. या कारवाईत अवैध दारुसाठीचे साहित्य, देशी, विदेशी मद्य साठा असा एकूण 1 लाख 83 हजार 871 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विधानसभा निडणूक आचारसंहिता आणि आजच्या ड्राय डे च्या दिवशी इचलकरंजी मधील शांतीनगर परिसरात 16 ठिकाणी घातलेल्या या छाप्यात अवैध दारु निर्मितीसाठी लागणारे पक्के, कच्चे रसायन, तयार हातभट्टी दारु नाश करण्यात आली. विविध ब्रँडचे देशी मद्य, विदेशी मद्य, बिअर, 240 किलो अखाद्य गुळ, फ्रिज, इलेक्ट्रीक वजन काटा जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आदींचा समावेश आहे.अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई यापुढे करण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply