

स्वर्गीय अनंतराव कोरंगावकर सामाजिक सेवा ट्रस्ट आणि कोरगावकर ट्रस्ट यांच्यवतींने आज ज्येष्ठ नागरी दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला सिद्धगिरी मठाचे अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी कोरगावकर ट्रस्टच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्यासाठी उदान देणाऱ्या आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या गौरव सोहळ्यात 23 जेष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना स्वामीजींनी आजकाल आई वडील मुलांवर आपले विचार लादून त्यांचा यात्रासारखा उपयोग करत आहेत.त्यांचे विचार व व त्यांना आवड असणारे शिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे.याचबरोबर मुलांना मोठयाचा आदर करण्यास शिकविणे व कोणतेही काम करण्याची सवय लावणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
डीवायएसपी स्वाती गायकवाड यांनी ही आई वडिलांच्या मुलांच्या आवडीचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी प्रमुख मान्यवर यांचे करवीर निवासिनी श्री अंबाबाई ची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले.यावेळी कर्नल संजीव सरनाईक मेजर संजय शिंदे ते पोलिस उपअधीक्षक स्वाती गायकवाड अशिष कोरगावकर राज कोरगावकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply