अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

 

कोल्हापूर:पचन आणि पोट विकाराच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी गेली 35 वर्षांपासून सेवाभावाने कार्यरत असलेल्या अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने “अंतरंग गॅस्ट्रोकॉन “2019 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय परिषदेचे आयोजन उद्या हॉटेल अयोध्या येथे करण्यात आहे,अशी माहिती तज्ञ डॉ.विवेकानंद कुलकर्णी यांनी दिली.
आजकाल अन्ननलिका, पचनसंस्था,पित्त,यकृत आणि स्वादुपिंडाचे तसेच आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे. सतत प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाने प्राथमिक अवस्थेत अचूक निदान तसेच अनेक गंभीर आजारांवर रुग्णास कमीत कमी त्रासात प्रभावी उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना व्याधीमुक्त सुखी, आनंदी, निरोगी जीवन जगण्यास मदत होते. या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी या परिषदेतचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद साडेनऊ ते सहा या वेळेत संपन्न होणार आहे.परिषदेचे उदघाटन 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. पद्मश्री अमित मायदेव,अमोल बायपे,डॉ. विनय थोरात, डॉ. एल.व्ही. कृष्णन, डॉ. राजेश धरमसी, डॉ.अमोल पावसकर, डॉ.आदित्य कुलकर्णी, डॉ. मनीषा कुलकर्णी या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच अंतरंग हॉस्पिटल येथील तीन ऑपरेशन थिएटर मध्ये पंधरा रुग्णांवर ऐनडॉस्कॉपी आणि लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण आयोध्या हॉटेल येथे दाखवले जाणार आहे. यात क्लिष्ट आजारांवर मोठी चिरफाड न करता अत्यंत प्रगत अशा दुर्बिणीच्या तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित डॉक्टरांची थेट संवाद साधण्यात येणार आहेत.त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. सदर परिषदेस पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटक मधील सुमारे एक हजाराहून अधिक डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. मनीषा कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!