कल्पना एक आविष्कार अनेक, मध्ये ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ विजेती

 

एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱ्या ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” तेह्त्तीसाव्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक -२०१९’ मध्ये हवेतून अन्न निर्माण करून मानवी जीवन संपन्न करणारा ते रासायनिक शस्त्रांचा जनक अशी दोन टोक अतिरेकी राष्ट्रवादाने गाठणाऱ्या फ्रिट्झ हेबर या राष्ट्रभक्त वैज्ञानिकाची गोष्ट सांगत समकालीन काळाकडे अप्रत्यक्षपणे निर्देश करणारी दिशा थिएटर-ओमकार प्रॉडक्शनची ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.याच एकांकिकेने सर्वाधिक वैयक्तिक पारितोषिक पटकावली.
ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी यंदा “स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे” ही कवी नामदेव ढसाळ यांच्या “निमित्त १५ ७१” या कवितेतली ओळ सादरीकरणासाठी विषय म्हणून सुचवली होती. प्राथमिक फेरीचे परीक्षण चंद्रकांत मेहंदळे,नीळकंठ कदम,प्रमोद लिमये आणि रमेश मोरे या मान्यवरांनी केले.
अजित भगत,विजय निकम,सुनील हरिश्चंद्र,संदीप रेडकर,राकेश जाधव.प्रणव जोशी,प्रमोद शेलार,,राम दौंड, दिशा दानडे,वर्षा दांदळे,भाग्यश्री पाणे,संदेश जाधव,वनिता खरात ही प्रस्थापित मंडळी आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेत आवर्जून उतरली.परीक्षण विषयसूचक जयंत पवार,गिरीश पतके आणि रवींद्र लाखे यांनी केले. या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक राजरत्न भोजने यांला ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ या एकांकिकेसाठी तर सिमरन सैद या अभिनेत्रीला अभिनयाचे तृतीय पारितोषिक मिळाले तर संकेत – प्रथमेश सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि श्याम चव्हाण सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार ठरला. गुरुनानक खालसा महाविद्यालयच्या “कोकोरिको” या एकांकिकेसाठी सूरज कोकरे – कुणाल पवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आणि सूरज कोकरेला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले तर देवाशिष भरवडे सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ठरला. एकता संघ, मुंबईच्या “व्यवस्थित गाढव” या एकांकिकेसाठी निशांत कदम सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय ठरला तर अविनाश साळवी याला अभिनयाचे पंचम पारितोषिक मिळाले. प्रवेश मुंबईच्या #support377 एकांकिकेसाठी दिशा दानडेला अभिनयाचे चतुर्थ पारितोषिक मिळाले.स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता अभिनय ही एकच श्रेणी या स्पर्धेत असते.
कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेला दर्दी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कार
‘अस्तित्व’ – ‘चारमित्र’ कल्याण आयोजित
कल्पना एक आविष्कार अनेक २०१९
अंतिम फेरी निकाल:
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम): ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ – दिशा थिएटर-ओमकार प्रॉडक्शन
एकांकिका (द्वितीय): कोणीही नाही
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सूरज कोकरे/कुणाल पवार – ‘कोकोरिको’
सर्वोत्कृष्ट लेखक : राजरत्न भोजने – ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’
सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : सूरज कोकरे – “कोकोरिको”
सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : निशांत कदम – “व्यवस्थित गाढव”
सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : सिमरन सैद – ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’
सर्वोत्कृष्ट अभिनय (चतुर्थ) : दिशा दानडे – ‘#सपोर्ट३७७’
सर्वोत्कृष्ट अभिनय (पंचम) : अविनाश साळवी – ‘व्यवस्थित गाढव’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : श्याम चव्हाण: ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : देवाशिष भरवडे – ‘कोकोरिको’
सर्वोत्कृष्ट संगीत : संकेत/प्रथमेश: ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!