
कोल्हापूर / प्रतिनिधी: वाहन क्षेत्रात रोज नवनवीन संशोधन होत असते. यामध्ये काही नाविन्यपूर्ण संशोधनामुळे क्रांती घडते. कोल्हापुरातील उद्योजक तनय शहा यांनी स्वतःच्या उच्च शिक्षणाचा वापर करून वाहन क्षेत्रात क्रांती घडवली आहे. पेट्रोलचे वाढणारे दर पाहता आणि त्याची भविष्यकालीन उपलब्धता लक्षात घेता हे इंधन कधीतरी संपणार आहे. याचा विचार करून तनय शहा यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा अभ्यास आणि संशोधन करून तंत्रज्ञानाचे सर्व निकष लावून संपूर्णपणे अत्याधुनिक फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर कोल्हापूरच्या बाजारात उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूरकरांना अभिमान वाटावा अशी मेड इन कोल्हापूर आरगॉन इलेक्ट्रिक स्कूटरचे पहिले शोरूम शिवाजी उद्यम नगर येथे शनिवाारी (दि.25 रोजी) सुरू होत आहे, अशी माहिती आरगॉन मोबिलिटीचे संचालक तनय शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही स्कूटर इंधनमुक्त, प्रदूषणमुक्त, अतिशय दणकट व इतर स्कूटरच्या तुलनेत कमी मेंटेनन्स खर्चात ग्राहक वापरू शकतात. लिथियम बॅटरीवर चालणारी ही स्कूटर एकदा बॅटरी चार्ज केली की 75 किलोमीटर पर्यंत धावते. फक्त बारा पैसे प्रति किलोमीटर आणि वर्षाला 20 हजार रुपये बचत करणारी ही स्कूटर अतिशय स्टायलिश आणि सर्वोत्तम पिकअप देणारी आहे. याशिवाय एक्सेंज, इन्शुरन्स, फायनान्स आणि सर्विस या सर्व सुविधा नवीन शोरूममध्ये उपलब्ध आहेत. दिवाळी आणि खास उद्घाटनानिमित्त या इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग वर पाच हजार रुपये किंवा एक ग्रॅम गोल्ड कॉइन गिफ्ट मिळणार आहे. वजनाने अत्यंत हलकी असलेली इलेक्ट्रिक स्कूटर सर्वांसाठीच वापरण्यास अत्यंत सोपी आहे. लायसन्स किंवा नोंदणीची गरज नाही. तरी लॉन्चिंग निमित्त देण्यात आलेल्या ऑफर्सचा फायदा घ्यावा असे आवाहन तनय शहा यांनी केले. यावेळी पांडुरंग पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply