बिलिंग काउंन्टर नसणारे एकमेव मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

 

कोल्हापूर : खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद पुणेच्यावतीने गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्ष सत्यात उतरत असून पुणे सातारा रोडवर शिरवळ ता.खटाव येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन१२ जानेवारी २०२० रोजी करण्यात येणार आहे.या हॉस्पिटलमध्ये कोणतेही बीलिंग काउंन्टर नसणार आहे. हे हाॅस्पिटल ३५० बेडचे असून सर्वसोयीनयुक्त असणार आहे.
अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक ऍड. वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शासनाच्या ज्या कागदोपत्री परवानग्या आवश्यक होत्या त्यांची देखील सर्व पूर्तता करण्यात आली आहे.रुग्ण हक्क परिषद, पुणे ही एक आयएसओ नामांकन संस्था आहे. सध्या राज्यभरामध्ये अनेक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा भरणा होत आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये गोर-गरीब रूग्णाना उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अनेकांना वेळेत आणि चांगले उपचार मिळत नसल्याने काहींचा तर दुर्देवी मृत्यू होतो. त्यामुळेच गोर-गरिब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरु होते. ही घोषणा आता सत्यात उतरत असून पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. १२ जानेवारी २०२० रोजी मान्यवरांच्या हस्ते या मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह गरीब रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतील.
पुणे येथे अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारल्यानंतर येणाऱ्या काळात कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांच्या नावाने गोरगरीब रूग्णासाठी पूर्णपणे मोफत हॉस्पिटल उभारण्याचा रुग्ण हक्क परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. ज्या गरजू रुग्णांना मोफत औषधोपचाराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी  शाहूपुरी 3 री गल्ली येेेथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डी. डी. पाटील, प्रधान सचिव डॉ. स्वानंद पंडित, महिला जिल्हा अध्यक्ष लतिका शहा, महिला उपाध्यक्ष रंजना पवार, शुभांगी साखरे, कार्याध्यक्ष मंगल खुडे, सहकार्याध्यक्ष राधिका खडके, डॉ साहिल आळतेकर, युवराज पाटील, आप्पासो म्हैशाळे, सुनील हळदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णांना सर्व हाॅस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळावेत या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!