नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा

 

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा स्वीकारल्या. या भेटींच्या माध्यमातून शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत त्यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन घेतले.

या दौऱ्यात श्री सिद्धगिरी क्षेत्र, कणेरी मठ येथील पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, नावीद मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र यड्रावकर, माजी आमदार के. पी. पाटील, भैया माने, संजय घाटगे आणि बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. सर्व मान्यवरांनी आमदार कौस्तुभ गावडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून पुढील सार्वजनिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शनही त्यांना लाभले.शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडणे, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देणे, शिक्षकांचे हक्क व सन्मान जपणे आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी विधायक प्रयत्न करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तसेच शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना आमदार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केली.दरम्यान, जुनी पेन्शन कृती समितीच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनीही नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी कृती समितीचे बाबा पाटील, दत्ता पाटील, संदीप पाटील, सुरेश संकपाळ, भीमनवर सर, खेडकर सर, ठोंबरे सर, सुनील भोर, सचिन नलवडे, प्रकाश पाटील आणि श्रीकांत पाटील उपस्थित होते.निवडणुकीतील विजयानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी आणि शिक्षक संघटनांकडून होत असलेले सत्कार यामुळे आमदार कौस्तुभ गावडे यांच्या पुढील विधिमंडळीन कार्याची दिशा आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील संवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!