सलमान खान फिल्मद्वारे येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या दबंग-3 या हिंदी चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.त्यात हूड–हूड दबंग–दबंग या गाण्यामध्ये हिंदु साधू, तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आला आहे.सलमान खानबरोबर साधूंना पाश्च्यात्त्यांप्रमाणे हिडिस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. त्यामुळे समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमान खानने हिंदु साधूंचा अवमान केला आहे, तशा प्रकारे मुल्ला–मौलवी किंवा फादर–बिशप यांना नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला आहे.हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे दबंग 3 या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत अन् तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली

Leave a Reply