
भेडसगाव/मारुती फाळके:साहित्यिकांनी राजसत्तेविरुद्ध जनसामान्यांच्या बाजूने बोलण्याचे धाडस दाखविलेच पाहिजे.अण्णा भाऊ साठे यांनी लोकांचा आवाज बनून धर्मसत्ता आणि राजसत्तेला आव्हान दिले,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अजय कांडर यांनी केले.गिरीश कर्नाड साहित्यनगरी,तुरुकवाडी ता.शाहूवाडी येथे आॕल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन,युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन व वारणा-कानसा फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी विद्यार्थी ,युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,अण्णा भाऊ साठे यांनी व्यवस्थेने भरडलेल्या माणसांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या.भारतीय संविधानात आविष्ष्कृत झालेली मूल्ये त्यांच्या साहित्याचा प्राण आहेत.संविधानाची पायमल्ली होण्याच्या सध्याच्या काळात अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढली आहे.संमेलनाचे उद्घाटक ,ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले,अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने संमेलन होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.तरुणांनी धर्मांध व जात्यंध विचारांपासून दूर राहून विवेकाच्या मार्गावरुन वाटचाल करण्याची गरज आहे.देशाला फॕसिझमपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
प्रमुख पाहूणे विजयकुमार जोखे म्हणाले ,अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने धर्मातील अनिष्ट रुढी परंपरांना ठोकर मारली.विकृत चालीरीतींना विरोध केला.त्यांचा हा विचार समजून घेण्याची आवश्यकता आहे.स्वागताध्यक्ष प्रा.प्रकाश नाईक म्हणाले,अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे.त्यांच्या साहित्यातील क्रांतीचा विचार नव्या पिढीने स्विकारून वाटचाल केली पाहिजे .
भाई भारत पाटील म्हणाले,श्रमिक कष्टकर्यांच्या मुक्तीसाठी अण्णा भाऊ साठेंचा विचार महत्वाचा आहे.देशातील सद्याची राजकीय स्थिती गंभीर आहे.लोकशाहीला वाचविण्यासाठी तरुणांनी लढा ऊभारावा.’अण्णा भाऊ साठे यांचे विचार व विद्यार्थी युवकांची जबाबदारी ‘या विषयावरील परिसंवादात डाॕ.मालती पाटील म्हणाल्या ,अण्णा भाऊ साठे यांनी माणुसकीला सर्वश्रेष्ठ मानून लेखन केले.त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुणांनी वाटचाल करावी.यावेळी डाॕ.सदाशिव पाटील,अशोक कुंभार ,प्रा.उमाकांत हत्तीकट यांनी विचार मांडले.बाबासाहेब परीट,हिंमत पाटील व तानाजी वाघमोडे यांच्या कथाकथनाला प्रतिसाद मिळाला.सुनिल चिंचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलन झाले.
अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा,केजी टु पीजी शिक्षण मोफत मिळावे,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती नियमित मिळावी यासह जेएनयु मधील विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा तसेच लोकशाही व संविधानाचा अनादर करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.
यावेळी जि.प. सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर,हरिष कांबळे,दिपक पाटील, सरपंच कृष्णात पाटील,माजी उपसभापती दिलीप पाटील,हणमंत कवळे,प्रकाश कांबळे,गणेश पाटील,हरिष पाटसुपे,गणेश सौंदडे,प्रवीण वाघमारे,आरती रेडेकर,प्रशांत आंबी,गोरक्ष सकटे,डाॕ.भानुदास गाडवे,प्रा.भिमाशंकर गायकवाड,प्रा.रघुनाथ मुडळे,प्रा.अजिंक्य बेर्डे ,सागर फाळके,रंगराव नाईक,विजयमाला निर्मळे आदींसह रसिक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रा.निलेश घोलप यांनी केले.तर आभार निमंत्रक हरिष कांबळे यांनी मानले.
Leave a Reply