
कोल्हापूर: जिल्हा परिषद शाळेसाठी आयोजित केंद्र गडमुडशिंगी ता .करवीर यांच्या वतीने आयोजित केन्द्रस्तरिय सांस्कृतिक स्पर्धेत समूहगीत या कलाप्रकारात विद्या मंदिर यादववाडी या शाळेने वरीष्ठ गटात द्वितीय तर कनिष्ट गटात तृतीय क्रमांक संपादन केला.विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी शाळेने स्पर्धेचे संयोजन केले होते.सांस्कृतिक स्पर्धेतील प्रत्येक वर्षाची परंपरा याही वर्षी शाळेने कायम राखली,यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी शंकर यादव,विस्तार अधिकारी भारती कोळी, केंद्रप्रमुख तुकाराम काटे,समनव्यक अनिल कंगणे,मुख्याध्यापक आनंद पाटील व सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन तर मार्गदर्शक मारुती फाळके,भिवाजी लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply