
कोल्हापूर : कोल्हापूरच्या एस. बी. चौहाण स्टीलचे साहिल सुरेश चौहाण हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहाण यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहाण हे ही स्पर्धा पूर्ण करणारे भारतातील जेंन समाजातील पाहिले व एकमेव स्पर्धक ठरले आहेत.
‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आयर्न मॅन २०१९’ ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे पार पडली. एकूण २२६ किमी चे असणारे अंतर चौहाण यांनी १३ तास ४५ मिनीटांत पूर्ण केले. यामध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे असे प्रकार त्यांना १७ तासांमध्ये पूर्ण करायचे होते. साहिल यांचे इंग्लंड येथून मास्टर ऑफ इंजिनीरिंग शिक्षण झाले आहे, चौहाण यांना यासाठी निळकंठ आखाडे, नितीश कुलकर्णी, सुचेता चव्हाण, दीपक राज, निल डी-सिल्वा यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply