आता पश्चिम महाराष्ट्रात गो गॅस एलपीजी सिलेंडर मिळणार

 

कोल्हापूर: कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड सुरवातीपासूनच गो गॅसच्या माध्यमातून राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी अग्रणी राहिली आहे व हरित क्रांतीच्या दिशेने मोठे योगदान देत आहे.आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ चांगली सेवा देत आहे.
कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड(CPIL) ही एक आघाडीची खाजगी एलपीजी बॉटलर आणि विपणन कंपनी आहे. गोगॅस आणि गो गॅस एलिट या नावाने कंपनी  एलपीजी पॅक्ड सिलेंडरमध्ये विक्री करीत आहे. त्याला अनेक राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.गो गॅस आता राष्ट्रीय स्तरावर एक नामांकित ब्रँड बनला आहे.गोगॅस एलिट- कॉम्पोझिट गॅस सिलेंडर हे एक क्रांतिकारी पाऊल असून येत्या काळात भारतीय स्वयंपाकघरात परिवर्तन घडवेल.सध्या एलपीजीच्या मागणीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे.असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे सिलेंडर उपलब्ध करुन देत आहोत.एलिट कॉम्पोझिट गॅस सिलेंडर्स हे अतिशय हलक्या वजनाचे असतात. सहज रित्या उचलता येतात. एलिट सिलिंडर्सचे संचय पारदर्शक असते. ज्यामुळे सिलिंडर्समध्ये गॅसचे प्रमाण नेहमीच दिसून येते.ह्यामुळे हे सुनिश्चित होते की योग्य प्रमाणात गॅसपुरवठा केला जातो आणि सिलिंडरमध्ये उपलब्ध गॅसची मात्रा सहजपणे तपासता येते. एलिट सिलिंडर ‘ब्लास्ट प्रूफ’ आहेत. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान होत नाही आणि  वापरणे अत्यंत सुरक्षित असते.आज 70 कोटीहून अधिक लोक एलपीजी वापरतात आणि पुढच्या काही वर्षात कॉम्पोझिट सिलेंडरचे फायदे लक्ष्यात घेता लोक कॉम्पोझिट सिलेंडरकडे वळतील अशी अपेक्षा प्रमुख सुमित भद्रा यांनी व्यक्त केली. हे सिलेंडर 2,5,10 आणि 20 किलो मध्ये उपलब्ध आहेत. नेहमीच्या सिलेंडर प्रमाणेच याचे काहीशे दर असणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!