इंडियन ऑइल-महाराष्ट्र पोलीस घेणार महामार्ग शिष्टाचार मोहीम

 

कोल्हापूर : रस्ते आणि महामार्गा वरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडियन ऑइल आणि महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. #महामार्ग शिष्टाचार (#हायवेमॅनर्स) या नावाने त्यांनी मोहीम हाती घेतली असून, राज्यभरातील महामार्गावर जागृती करण्यात येणार आहे.इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक (ब्रँडिंग) सुबोध डाकवाले आणि राज्याच्या वाहतूक विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन झाले. महामार्गावर होणाऱ्या जीवघेण्या आणि इतर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाहन्चालकांचे प्रबोधन या माध्यमातून करण्यात येईल. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी काय दक्षता घ्यावी हे देखील त्यांना सांगण्यात येईल. पुढील वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे.डाकवाले म्हणाले, दिवसेंदिवस रस्ते वाहतूक असुरक्षित होत चालली आहे. सध्या ती धोकादायक पातळीवर आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनचालकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत. राज्य महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे वाहांचालकांना सुरक्षित पद्धतीने वाहन चालविण्याची सवय लागेल. महामार्ग वाहतूक सुरक्षेबाबतही जागृती निर्माण होईल. या मोहिमेच्या माध्यमातून वाहन चालविण्याची एक रीत असते, हे ठसविण्यात येईल.राज्यातील रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूची संख्या घृणा वाटावी अशी आहे. अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला सुरक्षा उपाययोजना आखाव्या लागतील. इंडियन ऑइलच्या मदतीने आम्ही हे काम करणार असल्याचे, कारगावकर म्हणाले. ‘एक रणनीती घेऊन आम्ही ही मोहीम आखली आहे. वाहनचालकांच्या पारंपरिक सवयी बदलण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून केला जाईल, असे पोलीस अधिक्षक (मुख्यालय) विजय पाटील म्हणाले.राज्यातील प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. महामार्गावरील प्रमुख ठिकाणी जागृती करण्यात येईल. पुढील वर्षभर दरमहा जागृती मोहीम चालविण्यात येईल, अशी माहिती उपव्यवस्थापिका ( कॉर्पोरेट) अंजली भावे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!