
कोल्हापूर:सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये या योजना योग्य पद्धतीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणार्या उपचारांची गुणवत्ता,उपचार करतांना येणार्या अडचणी,उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क,औषधांचेदर,तसेच योजनेकरताखाटा राखीव ठेवण्याच्या नियमाचे पालन केले जाते कि नाही,याची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. या तज्ञांच्या समितीने त्रैमासिक अहवाल धर्मादाय आयुक्त तसेच राज्य शासनास सादर करणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात गेल्या 5वर्षांत या समितीने एकही बैठक घेतलेली नाही,एकाही रुग्णालयाची तपासणी केलेली नाही,तसेच शासनाला एकही अहवाल सादर केलेला नाही. 5 वर्षांत एक बैठकही घेऊ न शकणारी निष्क्रिय समिती त्वरित बरखास्त करण्यात यावी आणि याविषयी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने डॉ. उदय धुरी यांनी केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पू. शिवाजी वटकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता अरविंद पानसरे हेही उपस्थित होते.
Leave a Reply