
नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शून्य प्रहरात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की संरक्षित स्मारके आणि पुरातत्व स्थळे यांच्यावर अतिक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्याचबरोबर संरक्षित, प्रतिबंधित आणि नियमन करण्यात आलेल्या क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, फेरीवाले, गैरवापर, नुकसान वगैरे प्रकारची अतिक्रमणे या स्थळांवर होत आहेत. गेल्या पाच वर्षांत या स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निधी वाढवण्यात आला आहे, परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे या स्थळांची एकूण परिस्थिती आणि तेथील सुविधा योग्य नियोजन नसल्याने सुधारलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे येथील कामांवर दैनंदिन निगराणी आणि लक्ष ठेवले जात नाही. नियोजनशून्यता, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांचे केंद्रीयीकरण आणि अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने प्रत्यक्ष काम करतानाही अनेक अडचणी येतात.
Leave a Reply