
कोल्हापूर: हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, २२ डिसेंबर २०१९ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे मैदान, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रीवर हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. याचाच एक भाग म्हणून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाडये, अधिवक्ता समीर पटवर्धन, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये, हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ.मानसिंग शिंदे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश खोंद्रे उपस्थित होते.
Leave a Reply