
कोल्हापूर: हिमालयाबेबी केअर या भारतातील आघाडीच्या बेबीकेअर ब्रॅन्ड तर्फे कोल्हापूर येथे “माय बेबी ॲन्ड मी” या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मातांना लहान बाळांचे लसीकरण, त्यांची आरोग्य तपासणी तसेच बाळंतीणींची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली. बाळांच्या आरोग्याची माहिती तसेच विकासाची काळजी या संदर्भात माहिती देण्यासाठी हिमालया तर्फे शहरांतील डॉक्टरांची मदत घेण्यात आली होती तसेच त्यांच्या बरोबर संभाषणात्मक संवाद साधण्याची संधी मिळाली.“पालकांना नेहमीच बाळांचे आरोग्य, झोपण्याच्या सवयी, मसाज आणि साधारणत: बाळांची काळजी कशी घ्यावी याविषयी अनेक शंका असतात. “माय बेबी ॲन्ड मी” या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मातांना डॉक्टरांबरोबर चर्चा करण्याबरोबरच अन्य मातां बरोबर चर्चा करून त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्या विषयीच्या समस्यां विषयी माहिती मिळवण्यासाठी मंच उपलब्ध करून देत आहोत. “ माय बेबी ॲन्ड मी” च्या माध्यमातून आम्ही मातांना शहरांतील प्रतिथयश डॉक्टरांबरोबर चर्चा करून उपाय व विश्वसनीय गोष्टी समजण्याची संधी देत आहोत.” असे हिमालया ड्रग कंपनी च्याहिमालया फॉर मॉम्स आणि हिमालया बेबी केअर चे बिझनेस हेड श्री चक्रवर्ती यांनी सांगितले.यावेळी 45 हून अधिक माता उपस्थित होत्या.ऑब्स्टेट्रिशियन आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ .शकील महाबारी, बालरोग तज्ञ डॉ. विजय गावडे आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. अजहर मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विजय गावडे यांनी नवजात बाळांसाठी नियमित आरोग्य तपासणी करणे खूपच गरजेचे असते. अतिशय गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे असते. “माय बेबी ॲन्ड मी” मुळे जन्मानंतरची बाळाची काळजी, बाळंतपणानंतरचे कुटूंब नियोजन आणि स्तनपान यांसारख्या गोष्टींबद्दल माहिती मिळते.असे सांगितले बाळंतपणाच्या म्हणजेच बाळाचा जन्म झाल्या पासून २८ दिवसांचा कालावधी हा माता आणि बाळ या दोघांसाठी महत्त्वपूर्ण असतो आणि यांत मोठा धोका असतो. फळे, भाज्या आणि डाळींचा आहारात समावेश करणे मातेच्या आरोग्यासाठी चांगले असते कारण ती स्तनदा माता असते.त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढते असे ऑब्स्टेट्रिशियन आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ शकील महाबारी यांनी सांगितले.याबरोबरच बालकांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे ही यावेळी आयोजन हिमालयाबेबी केअर तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमात मातांना बाळंतपणातील दुखण्यांचे व्यवस्थापन आणि बाळाला मसाज करण्याची पध्दत तसेच माता व बालकाच्या आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.“माय बेबी ॲन्ड मी” हा हिमालया बेबी केअर तर्फे आयोजित करण्यात येणारा देशव्यापी उपक्रम आहे.
Leave a Reply