
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील मार्गदर्शक आणि बँकींग सल्लागार संस्था कर्नाड बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन ‘सहकाराची पंढरी’ असलेल्या कोल्हापुरात येत्या 21 आणि 22 डिसेंबर रोजी राज्यव्यापी सहकार परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद व्हि.टी पाटील स्मृती भवन येथे होणार असून सहकार चळवळ बळकट करण्यासाठी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या विविध समस्या प्रलंबित प्रश्नांवर तसेच सहकारी संस्थांवर रिझर्व बँक सहकार खाते आदी नियंत्रकांनाद्वारे केल्या जात असलेल्या कारवाईबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संचालक किरण कर्नाड आणि सौ .माधवी कर्नाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले राज्यात सहकारी संस्था म्हणून काम करीत असलेल्या बँका पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्यव्यापी सहकार परिषदेद्वारे एकाच समान व्यासपीठावर एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न आहे. जगात सर्वात मोठा सहकार असलेल्या आपल्या भारतात सहकार्याची सद्यस्थितीत दुर्दैवाने चांगली नाही. यातून सहकारी संस्थांना भारतीय रिझर्व बँक सहकार खाते यांच्या तर्फे चांगले वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांच्यावर अकारण निर्बंध लावले जात आहेत. यामुळे जनसामान्यांचा सहकार क्षेत्रावर चा विश्वास उडालेला आहे. सध्या सहकारी संस्थांची कुचंबणा होत आहे. या सर्व गोष्टींची चर्चा या सहकार परिषदेमध्ये होणार आहे. तसेच या सर्व संस्था, बँकांना या परिषदेमुळे फायदाच होईल असे किरण कर्नाड यांनी सांगितले. परिषदेमध्ये ज्योतींद्र मेहता, शेखर चरेगावकर, दिनेश ओऊळकर, अर्थतज्ञ डॉ. विजय काकडे, एल.एम कांबळे, प्रमोद कर्नाड असे सहकारातील दिग्गज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेला विकास जाधव यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply