
कोल्हापूर/ प्रतिनिधी: आज वैद्यकशास्त्रातील प्रगतीने माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. पण जीवनाचा दर्जा मात्र खालावला आहे. औषधोपचारांनी जरी ते जिवंत असले तरी त्यांना वेदनामय जीवनासाठी सामोरे जावे लागत आहे. वृद्धावस्थेत आलेल्या आजारपण, वैद्यकीय खर्च ,नव्या पिढीकडून होणारी अवहेलना ,आपल्यामुळे त्यांना होणारा त्रास असे अनेक प्रश्न वृद्धांच्या मनात येऊन आपलं आयुष्य आनंदानं समाधानानं आता जगून झाला आहे आणि आता कुणासाठी ओझं न बनता हे आयुष्य असंच समाधानात संपावं असं त्यांना वाटू लागला आहे.सन्मानाच्या जगण्या बरोबरच आपल्याला सन्मानाने मरण यावं असं त्यांना वाटू लागला आहे. यासाठीच जेरियाट्रीक सोसायटी ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने ‘सुखांत जीवनाचा ‘ हे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच चर्चासत्र आयोजित केले आहे.बुधवारी 25 डिसेंबर रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हे चर्चासत्र होणार असून या चर्चासत्रात पुणे येथील तज्ञ डॉ. शिवकुमार आय्यर व प्रदीप कुलकर्णी तसेच कोल्हापूर येथील तज्ञ डॉक्टर्स , मेंदू रोग विशेषज्ञ , वृद्धत्व रोगतज्ञ, क्रिटीकेअर विशेषज्ञ ,तत्त्वज्ञ, ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी, निवृत्त न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले आहे.अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संतोष घोटणे यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठांना मार्गदर्शनपर उपयुक्त व संग्रही ठेवण्यायोग्य ‘ज्येष्ठाधार ‘ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते व समाजसेविका सौ. स्मिता शिरगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.उपस्थित सर्वांना हे पुस्तक मोफत देण्यात येणार आहेत.
ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने कोल्हापुरात प्रथमच ‘ ज्येष्ठ नागरिक आरोग्य सहाय्यक प्रमाणपत्र ‘अभ्यासक्रम जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया व ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमाने घेण्यात आला होता. त्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रम सूरमयी स्वरांच्या सानिध्यात होणार आहे.
असा हा ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या कार्यक्रमाचा सर्व ज्येष्ठानी लाभ घ्यावा, असे सोसायटीच्या वतीने आवाहन करण्यात आले.पत्रकार परिषदेला
Leave a Reply