
कोल्हापूर : भारतातील प्रथम क्रमांकाचे फर्निचर आणि घरगुती उत्पादनांचे दालन, पेपरफ्रायच्या पहिल्या स्टुडिओचे कोल्हापूरमध्ये उदघाटन केले.पेपरफ्रायचे उद्दीष्ट, देशात फर्निचर आणि घरगुती उत्पादनांच्या श्रेणीमध्ये सर्वात मोठा ओमनी चॅनेल व्यवसाय तसेच विशिष्ट बाजारात प्रवेश करण्याचे आहे. २०१४ मध्ये पहिला स्टुडिओ सुरू केल्यानंतर साडे पाच वर्षात संस्थेने २४ शहरांमध्ये ६७ स्टुडिओसह त्यांचा ऑफलाइन फूटप्रिंटचा देखील झपाट्याने विस्तार केला आहे. महाराष्ट्रातील, मुंबई आणि पुणे मध्ये एकूण २१ स्टुडिओ आहेत.नवीन शाहुपुरी येथे १२१० चौरस फूट क्षेत्रात नवीन फ्रँचायझी स्टुडिओ स्थापन करण्यात आला आहे,जिथे कोल्हापूरच्या ग्राहकांना अफाट कॅटलॉग,अत्याधुनिक डिझाईन्स आणि उत्पादनांची उत्कृष्ट गुणवत्ता अनुभवता येईल जे खरेदीसाठी पेपरफ्रायच्या वेबसाईटवर पण उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त ग्राहक त्यांचे आयडियल घरे बनविण्यासाठी डिजाईन एक्सपर्ट कडून विनामूल्य मदत मिळेल.अशी माहिती अमृता गुप्ता आणि अजिंक्य कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबद्दल बोलतांना अमृता गुप्ता म्हणाल्या की,“महाराष्ट्रात २१ स्टुडिओ लाँच केल्यानंतर अजिंक्य कोरे यांच्या सोबत भागीदारी करत कोल्हापुरात आमचा पहिला स्टुडिओ आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून कोल्हापूरमधील आमच्या ग्राहकांना सहज प्रवेश मिळवून देणे आणि आमच्या विस्तृत-वैविध्यपूर्ण डिझाइन उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा अनुभव प्रदान करणे तसेच ग्राहकांना सुंदर घरे तयार करण्यासाठी मदत म्हणून तज्ञांद्वारे सल्ला देणे ज्यामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व आणि शैली प्रतिबिंबित होईल,हा आमचा हेतू आहे. ग्राहकांना शक्य तितक्या टच पॉईंट्स द्वारे उत्कृष्ट किंमत आणि विविधता प्रदान करणे हा पेपर फ्रायद्वारे आमचा हेतू आहे.
Leave a Reply