
कोल्हापूर : उत्तर प्रदेश राज्यात लखनऊमध्ये ‘मार्निंगवॉक’ला जातांना विश्व हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत बच्चन यांची २ फेब्रुवारी या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा अखिल भारत हिंदू महासभा निषेध करते आणि हत्या करणार्यांना त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले.या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री मनोहर सोरप, महिला आघाडीप्रमुख सुवर्णा पवार, सचिव श्री. संजय कुलकर्णी, शहराध्यक्ष जयवंत निर्मळ, सर्वश्री राजेंद्र शिंदे, मारुती मिरजकर, बनन हारणे, वंदे मारतम युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधून भाट्ये, पतित पावनचे श्री. सुनील पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते.
Leave a Reply