कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्यावतीने ‘पायोनियर 2020’ चे आयोजन

 

कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर ने 1997 साली सुरु केलेल्या पायोनियर या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे 23 वे पर्व येत्या 15 व 16 फेब्राुवारी 2020 कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत मध्यवर्ती स्तरावर अभिव्यक्ती (संशोधन पेपर सादरीकरण) व प्रकल्प (प्रकल्प स्पर्धा) या दोन स्पर्धा होणार आहेत. तसेच विभागवार 10 स्पर्धा होणार आहेत.
दि. 15 फेब्राुवारी 2020 रोजी होणा-या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. रामजी प्रसाद, आराहस विद्यापीठ, हरनिंग डेन्मार्क व सन्मानीय उपस्थिती म्हणून श्री. सत्यपत्री, कार्यकारी संचालक, सपलिंग प्रा.लि हे उपस्थित राहणार आहेत.
अभिव्यक्ती या मध्यवर्ती संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेत आंतरशाखीय दृष्टीकोन अवलंबिला आहे. यातील निवडक पेपर हे कॉलेजच्या जर्नलमध्ये आयएसबीएन (ISBN) नंबरसहित प्रकाशित केले जाणार आहेत. तसेच प्रकल्प (प्रोजेक्ट) या स्पर्धेमध्ये निवडलेल्या विजेत्यास इनक्युबेशन सेंटरचा (नियम व अटी लागू) पाठिंबा मिळणार आहे.
पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर अभिव्यक्ती (संशोधन पेपर सादरीकरण) व प्रकल्प (स्टार्टअप प्रकल्प स्पर्धा) या दोन स्पर्धा अशा पध्दतीने स्पर्धा पार पडणार आहेत.
दुस-या दिवशी म्हणजे 16 फेब्राुवारी 2020 रोजी जैवतंत्रज्ञान विभागाकडून प्रतिकृती, स्थापत्य विभागाकडून क्लालिब्राी, इलेक्ट्रॉनिक्स विभागाकडून सर्किट ग्यान, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि-कम्युनिकेशन विभागाकडून हायर्ड ऑर फॉयर्ड, कॉम्प्युटर सायन्स विभागाकडून कोडिगो, मेकॅनिकल विभागाकडून कॅड-कॅट इन्टिलेक्ट, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विभागाकडून गेम ऑफ कोडस्, प्रॉडक्शन विभागाकडून स्मार्ट ओ थॉन, पर्यावरणशारुा विभागाकडून इन्व्हीजन अशा पध्दतीने स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोपासाठी डॉ. उदय भोसले, संचालक, प्रेसिशन ऑटोमेशन अॅण्ड राबोटिक्स इंडिया (परी), सातारा उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल रु. 1,50,000/- रोख बक्षीसे, प्रमाणपत्रे व स्मृतीचिन्हे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे दोन महिन्यापासून जय्यत तयारी चालू आहे. या सर्व स्पर्धांच्या नोंदणीसाठी विद्याथ्र्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जवळपास 3000 विद्यार्थी यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
आयएसटीई (ISTE) चे स्डुटंड चॅप्टर चेअरमन म्हणून करण पाटील याची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. आर.एस.पाटील व सल्लागार प्राध्यापक म्हणून प्रा. ए.डी.पाटील काम पाहत आहेत. केआयटीचे चेअरमन श्री. भरत पाटील, व्हा. चेअरमन श्री. सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी श्री दिपक चौगुले व केआयटीचे विश्वस्त मान्यवर व संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!