
कोल्हापूर :शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावे यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन 2020 हे येत्या 7 ते 10 फेब्रुवारी या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येथील मेरी वेदर मैदान येथे भरविण्यात आले असून उद्घाटन दुपारी चार वाजता माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक असणार आहेत.यावेळी माजी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.धनंजय महाडिक,माजी आ. अमल महाडिक,जिल्हाधिकारी दौलत देसाई,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल,महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित असणार आहेत.तरी या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवर्जून कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.या चार दिवसात शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप केले जाणार आहे.यावर्षी प्रदर्शनाचे तेरावे वर्ष असून देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे याचबरोबर पशुपक्षीपालन विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे प्रदर्शन आहे.प्रदर्शनामध्ये 400 स्टॉलचा समावेश आहे. याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली 200 बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत. या प्रदर्शनास महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग,आत्मा यांचे सहकार्य लाभले आहे.भीमा उद्योग समुहासह क्रिएटिव्ह यांनी आयोजन केले आहे.
Leave a Reply