
कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदचौकासह शहराचे प्रवेशद्वार ताराराणी चौक ते व्हिनस कॉर्नर ,पापाची तिकटी आदी परिसरातील स्फूर्तीदायी विविध राष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांची शनिवारी व्यापक स्वच्छता मोहिम एनसीसीतर्फे राबविण्यात आली . यामध्ये महावीर कॉलेज, राजाराम कॉलेज महाराष्ट्र हायस्कूलसह शहरातील २०० हून अधिक एनसीसी कॅडेट,आयुक्त डॉ .मल्लिनाथ कलशेट्टी आणि महानगरपालिकेची यंत्रणा सहभागी झाली होती . शहराचे प्रवेशद्वार असलेल्या महाराणी ताराराणी, व्हिनस कॉर्नर येथील राजाराम महाराज पापाची तिकटी येथील महात्मा गांधींसह विविध पुतळ्यांची आणि परिसराची साफ – सफाई करत ऐतिहासिक बिंदचौकात या मोहिमेची सांगता करण्यात आली .या ठिकाणी परिसर स्वच्छता झाल्यानंतर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास आयुक्तांनी पुष्पहार अर्पण केला आणि सर्वांचे अभिनंदन करत या मोहिमेसह आगामी स्वच्छता व प्लास्टिकमुक्त शहर मोहिमेत एनसीसीने सहभागी होण्याचे आवाहन केले कर्नल एस . बी .सरनाईक, मुकेश कुमार , लेफ्टनंट उमेश वागरे, विश्वनाथ बिटे, एस एम. मुकेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली .
Leave a Reply