एम.सी.ए प्रवेश परीक्षा २८ मार्च रोजी तर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २२फेब्रुवारी

 

कोल्हापूर:शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून एमसीए (मास्टर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन) हा अभ्यासक्रम तीन वर्षाऐवजी दोन वर्षाचा करण्यात आला आहे. आज सर्वत्र व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणारे खूप सारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे करिअर निवड करण्यासाठी युवकांना असंख्य मार्ग मिळाले आहेत. त्यामध्ये एम. सी. ए. या एकमेव कोर्समुळे आय. टी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारतात व विविध देशामध्ये चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.आय.टी.क्षेत्राशी पूरक असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य, भविष्यातील संधी, विदयार्थी हित आणि इतर गोष्टीची दखल घेत एम. सी. ए. (व्यवस्थापन) चा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार केला आहे.एम.सी.ए.प्रवेश प्रणालीमध्ये गतवर्षापासून महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे बदल केला आहे. आणि तो बदल अजूनही विद्यार्थी पालक यांचेपर्यंत पोहचलेला नाही. म्हणून महाराष्ट्र असोसिएशनऑफ एम. सी. ए.इन्स्टिटयूटच्या वतीने विद्यार्थी पालक यांचेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.तसेच शैक्षणिक वर्ष २०२०.२१ करीता MCA-MH-CET प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून प्रवेश परीक्षेची तारीख २८ मार्च २०२० ही आहे. तर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२० ही आहे.महत्वाचे म्हणजे एम.सी.ए.कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी MH -CET ही एकमेव परीक्षा आहे.अधिक माहितीकरिता विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा. असे आवाहन मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ एम. सी. ए. इन्स्टिटूट (MAMI) चे अध्यक्ष डॉ. अमोल, डॉ. शिवाजी मंढे, डॉ. तानाजी दबडे व डॉ. बाळासाहेब भमानगोळ यांनी पत्रकार परिषदेत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!