
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापती शिवसेनेच्या नगरसेविका सौ.प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांची आज निवड झाली. या निवडीनंतर शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. नूतन परिवहन सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी शिवसेना शहर कार्यालय परिसर दणाणून सोडला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नूतन परिवहन सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगल साळोखे, माजी शहरप्रमुख सौ.पूजा भोर, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.पूजा कामते, सौ.शाहीन काझी, सौ. भोपळे, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, तुकाराम साळोखे, धनाजी दळवी, विशाल देवकुळे, रणजीत जाधव, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, राजू काझी, अंकुश निपाणीकर, सुशील भांदिगरे, पानपट्टीसेनेचे अरुण सावंत, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, दादू शिंदे, असिफ मुल्लांनी, साहिल मुल्लांनी आदी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply