
कोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी भवानी मंडप येथे गर्दी केली होती. ऐतिहासिक वारसा जाणा जपा आणि जगा असा संदेश यावेळी देण्यात आला. संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शिल्पकला व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील गड किल्ले व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संभाजीराजे यांनी वेळोवेळी राज्यसभेत आवाज उठवलेला आहे. वाढदिवसानिमित्त संभाजीराजे यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, खेळाडू, इतिहास प्रेमी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महापौर निलोफर आजरेकर, समरजित सिंह घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply